'द हाउंड ऑफ बास्करव्हिल'– सर आर्थर कॅनन डायल यांची हि
शेरलोक होल्म्स मालिकेतील उत्कंठावर्धक कादंबरी आहे.
कथेची सुरुवात होते ती बेकर स्ट्रीट वर. शेरलोक होल्म्स आणि
त्यांचे सहकारी डॉ. वॅटसन यांना भेटायला डॉ. मार्टिमर एक समस्या
घेऊन येतात. डेव्हनशायर येथे राहणारे डॉ. मार्टिमर यांचे मित्र व पेशंट सर चार्ल्स बास्करव्हिल यांचा अचानक मृत्यू होतो. ते त्यांच्या
घराजवळील माळरानावर मृतावस्थेत आढळतात. त्यांचा मृत्यु हृदयावर अति ताण आल्याने
झाल्याचे नष्पन्न होते. त्यांचा चेहरा अविश्वानीय वाटेल इत्त्का पिळवटला होता. त्यांचा
मृत्यू बास्कार्व्हील घराण्याला लाभलेल्या शापामुळे (हाउंड मुळे) झाल्याचा संशय काही
जणांना असतो.
बास्करव्हिल घराण्यातील पूर्वजांपैकी एक हुगो बास्करव्हिल
हे एका तरुणीस पळवून आणून आपल्या घरी बांधून ठेवतात. ती तरुणी त्यांच्या तावडीतून
सुटून पळून जाते. ह्युगो तिच्या मागे जातात. बराच वेळ परत न आल्यामुळे ह्युगो चे
मित्र त्यांना शोधण्यास जातात. तेव्हा त्यांना ह्युगो आणि ती तरुणी मृतावस्थेत
आढळले. त्यांच्या मृत्यूचे कारण एक अवाढव्य कुत्रा(हाउंड) त्यांना दिसतो. त्याचे
ते रूप पाहन ते सर्व तिथून धूम ठोकतात.त्यांच्यातील एकाचा मृत्यू होतो तर उर्वरित आयुष्यभर लोळागोळा होऊन खितपत पडतात.आणि त्यानंतर बास्करव्हिल घराण्यातील
अनेकांना अचानक व रहस्यमय मरण आले.
सर चार्ल्स यांचे वारस सर हेन्री बास्करव्हिल परदेशातून
लंडन येथे येतात. त्यांच्या देखील जीवाला धोका असल्याचे होल्म्स यांना समजते.
शेरलोक होल्म्स सर हेन्रीन्सोबत डॉ. वॅटसन यांना डेव्हनशायर येथे पाठवतात.
डेव्हनशायर येथे स्टेपलटन, फ्रँकलँड आणि बॅरीमूर हि पात्रं कथेत येतात आणि कथा अधिकच रंजक होते.
डेव्हनशायर येथे माळरानावर घडणाऱ्या घटना अधिक रहस्य निर्माण करतात. सर आर्थर कॅनन
डायल यांनी माळरानाचं इतकं उत्कृष्ट वर्णन
केला आहे कि ते माळरान कथेमध्ये एका पात्रापेक्षा
कमी नाही. शेवटी अनेक नाट्यमय घडामोडी घडतात आणि अपेक्षेप्रमाणे शेरलोक
होल्म्स सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे कारण शोधून काढतात आणि सर हेन्री यांच्या
जीवाला असलेला धोका पण दूर करतात. त्यांच्या लेखनातील ताकद म्हणजे कित्येक
वर्षांपूर्वी लिहिली गेलेली हे कादंबरी २०१३ मध्ये देखील तितकीच रंगतदार आणि
वाचनीय आहे.
No comments:
Post a Comment