मराठी म्हणी (continued) -
१. थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसांच्या आश्रयाखाली राहणाऱ्या क्षुल्लक माणसाला मान मिळतो या अर्थाची ही म्हण आहे.
२. अडाण्याची मोळी भलत्यास गिळी - अडाणी माणसाने एखादी गोष्ट केली तर त्याचा परिणाम विपरीत होतो.
३. कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा - कुठल्याही संकटातून बाहेर पडल्यावर लगेच आणखी एक संकट समोर येणे.
४. एकादशी च्या घरी शिवरात्र - एक दारिद्री व्यक्ती दुसऱ्या दारिद्री व्यक्तीला काय मदत करणार अशा अर्थाने ही म्हण वापरतात.
५. सासू नाही घरी नणंद जाच करी - मालक हजार नसतांना नोकर मालकाच्या रुबबतात वावरतो. .
६. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला - एका व्यक्तीकडून अनेक ठिकाणी त्रास होणे.
७. ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला - कोणत्याही कामात उताविळपणा करून घाई करणे.
८. चोरी काकडीची शिक्षा फाशीची - छोट्याश्या किंवा क्षुल्लक गोष्टीला अवाजवी महत्व देणे. .
९. आंधळी पाण्याला गेली आणि घागर फोडून आली - अडाणी माणसाच्या हाती एखादे काम दिल्यास तर त्या कामाचा बोजवारा उडतो.
१०. हातावर कमवावे, पानावर खावे - दररोज मेहनत करून जे मिळेल त्यावर उपजीविका करणे.
No comments:
Post a Comment