Pages

Wednesday, September 7, 2011

मराठी म्हणी - 

१. सात सुगरणी आणि भाजी अळणी - एका कामासाठी पुष्कळ  जणांची नेमणूक करूनसुद्धा काम व्यवस्थित न होणे या अर्थाने हि म्हण वापरतात..

२.हिंग गेला वास राहिला - हिंगाचा वास जसा लवकर जात नाही तसा एखादी घटना झाल्यानंतर त्याबद्दल  चर्चा करणे..

३. लोकांचे शिकले वडगाव विकले - लोकांच्या नादी लागून भलतीच गोष्ट करणे.

४. तरण्याचे  झाले कोळसे  अन म्हातार्याचे आले बारसे - काम करण्यासाठी  तरुणाने आळशीपणा करावा आणि म्हातार्याने  उत्साहाने काम करणे.

५.हौसेने केला पती त्याचा झाला रगपती - एखादी  गोष्ट हौसेने करूनदेखील त्याचा शेवट निराशेनेच व्हावा.

६. पाय धू म्हटलं तर म्हणे तोडे कितीचे   - सांगितलेला काम न करता भलतीच चौकशी करणे.

7. नात्याला  नाही पारा आणि निजायला नाही थारा - नातेवाईक किंवा  मित्र मंडळी खूप असून देखील संकटाच्या वेळी कोणी धावून न येणे.

८. वकूब थोडा दिमाग बडा - योग्यता अगदी थोडीशी पण रुबाब मात्र खूप मोठा दाखवणे. 

९. सासू गेली उन्हाळ्यात, आसू आले पावसाळ्यात - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर पश्चाताप करणे.

१०. दुभत्या गाईच्या लाथा गोड - ज्या गोष्टी पासून आपल्याला काही लाभ आहे, त्याचा त्रास  त्रास गोड वाटतो.


3 comments: